मुंबई: स्ट्रोक उपचारांच्या क्षेत्रात परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलने मोठी कामगिरी बजाविली असून या हॉस्पिटलला वर्ल्डस्ट्रोक ऑर्गनायझेशन (WSO) – एनएबीएच अॅडव्हान्स्ड स्ट्रोकसेंटरचे मानांकन मिळाले आहे. हे मानांकनमिळवणारे ग्लेनईगल्स हॉस्पिटल मुंबईतील एकमेव हॉस्पिटल ठरले आहे.
ही मान्यता रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा, क्लिनिकल प्रोटोकॉल, आपत्कालीन प्रणाली आणि स्ट्रोकच्या रुग्णांकरिताप्रगत सेवा, निदान आणि उपचारांच्या आधारवरमिळाली आहे. स्ट्रोक रुग्णांनातातडीने, अचूक आणि जागतिकदर्जाचे उपचार देण्याची ग्लेनईगल्स हॉस्पिटल्सची क्षमता वाखण्याजोगी आहे. या स्ट्रोककार्यक्रमाचे नेतृत्व अत्यंत कुशल टीमकडून केलेजाते, ज्यात तीन वरिष्ठ तज्ज्ञडॉ. शिरीष हस्तक, डॉ. नितीन डांगे, डॉ. पंकज अग्रवाल, इंटरव्हेंशनलतज्ञ आणि क्रिटिकल केअरफिजिशियन यांचा समावेश आहे, जे स्ट्रोकच्यानिदानापासून ते रुग्ण बराहोईपर्यंतच्या
सर्वचटप्प्यांवर महत्त्वाची भूमिका बजावतात . यामध्ये 'डोअर-टू-नीडलटाइम' (DTNT) आणि 'डोअर-टू-ग्रोइन टाइम' (DTGT) यांसारख्या महत्त्वाच्या वेळसंबंधीत मानकांचे पालन केले जाते, जे स्ट्रोकच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण ठरतात.
ग्लेनईगल्सहॉस्पिटलमध्ये एक प्रगत न्यूरोक्रिटिकल केअर युनिट आहे, जे तीव्र स्ट्रोकसह गंभीर न्यूरोलॉजिकल स्थिती असलेल्या रुग्णांसाठी तयार करण्यात आलेआहे. हे रुग्णालय जलदथ्रोम्बोलिसिससाठी कठोर आंतरराष्ट्रीय मानकांचेपालन करते आणि उपचारांचेपरिणाम सुधारण्यासाठी ४.५ तासांच्यामहत्त्वाच्या "गोल्डन विंडो"मध्ये उपचार पुरविले जातात.
ग्लेनईगल्सहॉस्पिटलमध्ये 24x7 स्ट्रोक टीम, अत्याधुनिक न्यूरो-इमेजिंग सुविधा, थ्रोम्बोलायसिस व थ्रोम्बेक्टॉमी उपचार, प्रशिक्षित न्यूरोलॉजिस्ट, न्यूरो-सर्जन, इंटेन्सिव्ह केअर तज्ज्ञ आणिसमर्पित स्ट्रोक केअर प्रोटोकॉल उपलब्धआहेत. या सर्व बाबींच्याकाटेकोर मूल्यमापनानंतर या हॉस्पिटलला हेआंतरराष्ट्रीय मानांकन प्रदान करण्यात आले आहे.
एनएबीएचप्रमाणपत्राव्यतिरिक्त, ग्लेनईगल्स हॉस्पिटलला वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन (WSO)/एंजल्स अवॉर्ड्स समितीकडूनही विशेष मान्यता मिळाली. ही एक आंतरराष्ट्रीयसंस्था आहे जी स्ट्रोकडेटा रिपोर्टिंग, उपचारांची गुणवत्ता आणि रुग्णांचे परिणामसुधारण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रुग्णालयांचा सन्मान करते.
ग्लेनईगल्सहॉस्पिटल, मुंबईचे सीईओ डॉ. बिपिनचेवले म्हणाले, एनएबीएच आणि डब्ल्युएसओ हेदोन्ही मानांकन मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाचीबाब असून ही आमच्याकामाची पोचपावती आहे. हे मानांकन मिळवणारेग्लेनईगल्स हॉस्पिटल मुंबईतील एकमेव हॉस्पिटल ठरले आहे. दिवसेंदिवसस्ट्रोकच्या रुग्णांची संख्या वाढत असून आम्हीआपत्कालीन प्रतिसाद प्रणाली मजबूत करण्यावर आणि वेळीच निदानकरत अचूक उपचार प्रदानकरण्यावर लक्ष केंद्रित करतआहोत.

